अपघात

पिंपळगाव येथे पोहणे शिकायला गेलेल्या शाळकरी मुलाचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, थर्माकोल सुटल्याने घडली दुर्घटना 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील पिंपळगाव येथील आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारा विद्यार्थी विराज विशाल शिनगारे वय १४ वर्षे हा सांगवी शिवारा तील विहिरीत थर्माकोल कमरेला बांधून पोहायला शिकण्यासाठी गेला असता,कमरेचे थर्माकोल अचानक सुटल्यामुळे ३५ फूट खोल पाण्यात बुडून गुरूवारी त्याचा मृत्यू झाला आहे.पिंपळगाव येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारा विराज विशाल शिनगारे वय १४ वर्षे हा विद्यार्थी गुरुवार दि.३०एप्रिल रोजी दुपारी आपल्या मित्रांसोबत सांगवी शिवारातील बाळासाहेब केदार यांच्या शेतातील गबार नावाच्या विहिरीवर पोहायला शिकायला गेला होता.

पोहायला शिकण्यासाठी त्याने कमरेला थर्माकोल बांधून विहिरीत उडी मारली असता,त्याच्या कमरेला बांधलेले थर्माकोल सूटल्यामुळे तो विहिरीतील ३५ फूटखोल पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला.या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पी.टी. चव्हाण,शंभूराज दराडे व गृहरक्षक दलाचे जवान सुरज भैरट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन प्रारंभी स्थानिक पातळीवर शोधमोहीम राबविली. परंतु त्यात यश न आल्यामुळे पैठण येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.

या पथकाने गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पार्थिव बाहेर काढल्या नंतर केज येथील उप जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर पिंपळगाव येथे शुक्रवारी दुपारीं १ वाजण्याच्या दरम्यान विराजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!