मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षण मिळाले नाही हि सल मनात ठेऊन तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील होळ येथील श्री वैभव उर्फ गणेश बालासाहेब शिंदे वय वर्षे 25 यांनी दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याविषयी मिळालेली माहिती अशी की,होळ गावात नागरिकांमध्ये अशी चर्चा ऐकावयास मिळाली की,श्री वैभव उर्फ गणेश बाळासाहेब शिंदे हे मराठा आरक्षणा संदर्भात बऱ्याच वेळेस अंतरवाली व मुंबई येथे गेले होते.व आरक्षण मिळाले म्हणून मुंबई येथून सर्वजन आनंदाने परत आली मात्र आल्या नंतर जिकडे तिकडे ओबीसी समाजाने हि मराठा आरक्षणाला विरोध म्हणून जिकडे तिकडे मोर्चा काढून निषेध करत आहेत हिच सल मनात ठेऊन आता आता मराठा समाजाला आरक्षण मिळते कि नाही म्हणून संतापाने शेतात जाऊन एका झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली .
आत्महत्या केलेली घटना दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री सात वाजता घडली आहे. स्व.वैभव याच्या पार्थीवावर मोजे होळ येथे दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अंतसंस्कार करण्यात आले.यावेळी होळ पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.स्वर्गीय वैभव यांच्या पश्चात पत्नी दिपाली व एक मुलगा राजवीर व आई वडील असा परिवार आहे.