अपघात

खा.बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा मस्साजोग येथे अपघात,  बजरंग सोनवणे सुखरूप कार्यकर्त्यांनी काळजी करू नये – खा.बजरंग सोनवणे 

केज/प्रतिनिधी

मंगळवार रोजी दुपारी बीड येथील नियोजित कार्यक्रम पूर्ण करून मस्साजोग येथील विवाह सोहळ्यास जात असताना,मस्साजोग येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी थांबलो असताना पाठीमागून आलेल्या एका तरुणाची दुचाकी माझ्या वाहनावर येऊन आदळली.सुदैवाने तो तरुणही पूर्णपणे सुरक्षित असून त्यालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.

परमेश्वराची कृपा आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या अपघातात मला तसेच माझ्यासोबत असलेल्या कोणत्याही सहकाऱ्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.आम्ही सर्वजण पूर्णपणे सुखरूप आहोत.या घटनेमुळे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.सध्या मी केज कडून पुण्याकडे प्रवास करत असून पूर्णपणे सुरक्षित आहे.त्यामुळे कुणीही काळजी करू नये.अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांनी काळजी पोटी संपर्क साधून विचारपूस केली. आपल्या प्रेम,आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे.काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मी पूर्णपणे सुरक्षित असून लवकरच पुन्हा जनतेच्या सेवेत हजर राहीन खा.बजरंग मनोहरराव सोनवणे (खासदार,बीड लोकसभा मतदारसंघ) यांनी कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!