सामाजिक

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात जागतिक रक्तदाता दिन उत्स्फुर्त भाषणस्पर्धा व व्याख्यान कार्यक्रमाने संपन्न.

केज/प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक १४ जुन २०२६ रोजी जागतिक रक्तदाता दिन उत्स्फुर्त भाषण स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रम घेवून संपन्न झाला. रक्ताची कमतरता आणि रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची गरज या विषयावर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांची थोडक्यात व्याख्याने झाली.प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब जाधव,रमेशराव गायकवाड,ए.बी. गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड,श्रुती पुंड यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी सरपंच रामराजे गायकवाड हे होते.

त्यानंतर उत्स्कुर्त भाषण स्पर्धा घेण्यात आली. यात गौरी ज्ञानेश्वर गायकवाड,शिवराज जाधव,हर्षद गायकवाड, चैतन्य गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, आनंद गायकवाड यांनी सहभाग घेतला.उत्स्फुर्त भाषण स्पर्धेत गौरी गायकवाड यांनी प्रथम तर आनंद गायकवाड यांनी द्वितीय प्राविण्य मिळविले.परिक्षक म्हणून दादासाहेब गायकवाड यांनी काम केले.तसेच प्रथम,द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरण दादासाहेब गायकवाड व डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!