आशिष धिवार यांच्या कुटुंबाची दीपक कांबळे यांनी घेतली भेट, कुटुंबाचे केले सांत्वन

केज/प्रतिनिधी
न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेल्या बीड जिल्ह्यातील काळेगाव घाट ता.केज येथील युवक आशिष धिवार यांच्याकुटुंबीयांची केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशावरून रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले तसेच दोषीं वर कारवाईची मागणी केली.केज तालुक्यातील आशिष अशोक धिवार यांचा न्यायालयीन कोठडीत असताना बीड येथे मुत्यु झाला.
केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशावरून रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे आणि केज तालुका सरचिटणीस गौतम बचुटे,दिलीप बनसोडे, यांच्यासह कार्यकर्त्यांनी आशिष धिवार यांच्या कुटुंबाची काळेगाव येथे जाऊन भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अशोक भंडारे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात आशिष धिवार याचा दि.२८ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडीत तुरुंग पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जी पणामुळे,मानसिक छळ व आरोग्यसुविधा देण्यात दिरंगाई केल्यामुळे आणि पोलिस कोठडीतील अमानुष छळ व मारहाणीमुळे झालेल्या संशयास्पद मुत्युची एस.आय.टी.मार्फत चौकशी करून संबधीत दोषी तुरुंग अधिकारी, कर्मचारी,पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि चुकीची माहिती अहवाल देणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करून त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे. तसेच आशिष धिवार यांच्या कुटुंबाला शासनाने २५ लाख रुपयांची मदत करण्यात यावी अशा मागण्यांचा समावेश आहे.



