महिलेस फोनवर अश्लिल संभाषण व शिवीगाळ करणा-या माजी मुख्याध्यापकावर पुन्हा गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेस अश्लिल संभाषण व शिवीगाळ करणा-या माजी मुख्याध्यापक तथा वकील महेबुब काझी याच्यावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मांडवा ता. वाशी,जि.उस्मानाबाद –धाराशिव (हल्ली मुक्काम केज,जि.बीड) येथील आसिया सलाहुद्दीन काझी यांनी दिनांक 25 जुलै 2025 रोजी केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात फिर्यादी यांनी म्हटले आहे की,दिनांक 24 जुलै 2025 रोजी सांयकाळी 06-27 वाजण्याचा सुमारास त्यांचा सख्खा दिर ॲड. मेहबुब काझी (निवृत्त मुख्याध्यापक) याने मांडवा,ता.वाशी येथील फिर्यादीच्या प्राॕपर्टी बाबत बोलणे सुरु करून फिर्यादींना अश्लील भाषेतसंभाषण व शिवीगाळ केली. म्हणून केज पोलिस ठाण्यात फिर्यादींच्या तक्रारीवरून आरोपी मेहबुब काझी याच्या विरुध्द भारतीय न्याय संहितेचे कलम 79 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल त्र्यंबक सोपने हे करीत आहे.
यापुर्वीही व्हाट्सॲपवर एका महिला आणि लहान मुलीबाबत अश्लिल व अभद्रभाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी आरोपी महेबुब काझी याच्याविरुध्द दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथील माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 79 आणि 356 (2) प्रमाणे गुन्हादाखल झाल्याने त्यास मुंबई पोलिसांच्या वतीने अटक करून जामीना वर सोडण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे दिनांक 06 जुलै 2025 रोजी आरोपी मेहबुब काझी,त्याची मुलगी ॲड.फिजा काझी, त्याचा मुलगा जाहेद काझी आणि पत्नी शाहीन काझी या चौघां विरुध्दही पोलिस ठाणे वाशी जि.उस्मानाबाद – धाराशिव येथे घरात घुसून अतिक्रमण करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम 329(2),329 (3), 352 आणि 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यातही नमुद चारही आरोपी जामीनावर आहे.तरीही नमुद आरोपींना कायद्याचा कोणताही धाक नसल्याने त्यांच्या गुन्ह्यांचे सत्र सुरुच आहे.