अपघातसामाजिक

दुचाकीसाठी पेट्रोलचा शोध,अपघातात तरुणाचा बळी

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील औरंगपुर येथील तरुण विवेक सुधीर रानमारे वय २७ वर्षे हा दुचाकीवर पेट्रोल आणण्यासाठी अंबा साखर परिसरातील पेट्रोल पंपावर गेला होता परतताना रविवार रोजी रात्री ११ च्या सुमारास वाजता टॅंकर दुचाकी यात जोराची धडक झाली यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला स्वाराती रुग्णालयात उपचारा दरम्यान सोमवारी सकाळी त्याचे निधन झाले.मागील चार दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी चा सर्वत्र तुटवडा आहे. गाडीत पेट्रोल आणण्यासाठी गेलेल्या तरुणांचा अपघातात बळी गेला. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून टॅंकर ताब्यात घेतले. तरुणावर औरंगपूर येथील शेतात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अत्यंत शांत स्वभाव व हुशार व्यक्तीमत्व,लातुर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नाशिक येथे मेडीसीन कंपनीत कार्यरत होते. तसेच हाडाचे चाळे बसवणे खांदे, गुडघा, मनका दुखणे यावर उपचार करण्यात ते तरबेज होते.आजोबांचा वारसा जोपासत हजारो रुग्ण दुरुस्त केले होते. माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते सुधीर रानमारे यांचा तो मुलगा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!