जसा लातूर पॅटर्न,तसाच केज पॅटर्न नावारूपास येतोय – पत्रकार मधुकर सिरसट.

केज/प्रतिनिधी
शाहु कॉलेजच्या स्क्रीनिंग टेस्ट परीक्षेत,केज येथील आवाड एज्युकेशनल अँकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, यावर्षी या परीक्षेत ए ई ए च्या 13 विद्यार्थ्यांनी पहिल्याच यादीतून शाहू कॉलेजला 8 व संत तुकाराम कॉलेजला 5 अशा एकूण 13 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.त्यामूळे जसा लातूर पॅटर्न,राज्यात गाजला आहे,तसा केज पॅटर्नही नावारूपास येतोय असे विचार केज येथील आवाड एज्युकेशनल अँकॅडमी मध्ये पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात अध्यक्षीय समारोप करताना पत्रकार मधुकर दादा सिरसट बोलत होते.
राजर्षी शाहु कॉलेजची स्क्रीनिंगची परीक्षा म्हणजे महाराष्ट्रातील 11वी च्या प्रवेशासाठीची सर्वात मोठी परीक्षा असते कारण या परीक्षेला पंधरा-वीस हजार परीक्षार्थी 120 जागांसाठी चुरशीने अभ्यास करतात.मिनी नीट समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत दरवर्षी आवाड एज्युकेशनल अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात निवडले जातात.यावर्षी ही या परीक्षेत ए ई ए च्या 13 विद्यार्थ्यांनी पहिल्याच यादीतून प्रवेश मिळवला. असून त्यापैकी 8 विद्यार्थी शाहू कॉलेज व 5 विद्यार्थी संत तुकाराम कॉलेजसाठी निवड झाली आहे.
या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर, प्रा.चंद्रकांत डांगे व जाधव सर हे व्यासपीठावर हजर होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही शाहु कॉलेजच्या स्क्रीनिंग टेस्ट परीक्षेत, आवाड एज्युकेशनल अँकॅडमीच्या आकांक्षा सांजुरे, श्रावण चाटे, अपेक्षा आढाव,विराट बांगर,श्रेयश बनसोडे, प्रज्ञा घुले,आदित्य मुळे, हिंदवी यादव या 8 विद्यार्थ्यांची शाहू कॉलेज साठी तर ज्ञानदा गायकवाड,सई साखरे, सलोनी रिणवा,आयुष सातपुते,अद्वैता राऊत या पाच विद्यार्थ्यांची संत तुकाराम महाविद्यालया साठी निवड झाली आहे.
प्रास्ताविक आवाड एज्युकेशन अँकँडमीचे संचालक प्रा.डॉ.विठ्ठल आवाड यांनी केले.व यश हे केज मधील शैक्षणिक वातावरणामुळे व टीम वर्कमुळे मिळाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.यावेळी प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर,चंद्रकांत डांगे सर आणि जाधव सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अँकॅडमीच्या फाऊंडेशन व सराव परिक्षेचा खूप फायदा झाल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.सीमा आवाड यांनी केले.या प्रसंगी आवाड अकॅडमीचे शिक्षक, शिक्षिका,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



