श्रीकृष्ण गुरुकुलचे अध्यक्ष गणेश काळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बीड/प्रतिनिधी
श्रीकृष्ण गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष गणेश काळे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन दीर्घायुष्य व निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात उद्योजक सुनील आनभुले,लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे,ग्रामसाधन व्यक्ती रज्जाकशेख,ग्रामपंचायत अधिकारी अशोक पौळ, दीपक आनभुले,कृष्णा लोखंडे, कृष्णा आनभुले आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी गणेश काळे यांनी शिक्षण,संस्कार व समाजहिताच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक केले.
श्रीकृष्ण गुरुकुल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासह नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करताना उपस्थितांनी गणेश काळे यांना पुढील सामाजिक,शैक्षणिक आणि जनहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम आनंदी वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.



