

केज/प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित, बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केजचे प्राचार्य डॉ.फावडे माधव ग्यानोबा हे ३६ वर्षाच्या शिक्षणक्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती होत आहे.दिनांक १६जून २०२६ रोजी महा विद्यालयाच्यासांस्कृतिक सभागृहामध्ये सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई रमेशराव आडसकर,सचिव श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस तसेच प्रमुखपाहुणे म्हणून प्राचार्य गौतम पाटील, सरस्वती महाविद्यालय केज व प्राचार्य व्यंकट आणिगुंठे,कला महा विद्यालय नांदूर घाट, प्राचार्य हेमंत देशमुख, वसंत कनिष्ठ महाविद्यालय केज, डॉ.अनिल किर्दंत, प्राचार्य बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज हे उपस्थित होते. सेवापुर्ती सोहळ्यामध्ये दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संस्थेचे स्थानिक समिती सदस्य,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य माधव फावडे यांचा सन्मान करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.डॉ.माधव फावडे यांचा शैक्षणिक व प्रशासकीय प्रवास अतिशय दैदिप्यमान राहिला आहे.त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला असून त्यांनी आपले प्रार्थमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा गुरदाळ ता.उदगीर मधून पूर्ण केले.त्यांचे अकरावी ते पदवी पर्यंत चे शिक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर मधून पूर्ण झाले . त्यांनी वनस्पतीशास्त्राची पदवीत्तर पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठातून पूर्ण केली.
पीएचडी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडाविद्यापीठ नांदेड येथून पूर्ण केले. त्यांची शैक्षणिक जडण घडण डॉ.ना.य.डोळे सर,डॉ.मुकादम सर,डॉ. एल.व्ही.गंगावणे सर, डॉ.व्ही.एन. नाईक सर, डॉ.पैई सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित वसंत महाविद्यालय केज येथून कै.बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली १९९१मध्ये पदवी अध्यापनाची सुरुवात केली.त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्या मुळे त्यांनीमहाविद्यालया तील राष्ट्रीय सेवा योजने चे १० वर्ष कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्य केले.त्याच्या कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट कार्यक्रम आधीकारी म्हणून सन्मानितकेले.अध्यापना सोबतच आपल्या कार्य कर्तृत्वाने प्रशासकीय कार्यांचा वेगळा ठसा उमटवला.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेचे सचिव मा. रमेशरावजी आडसकर साहेब यांनी त्यांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून नेमणूक दिली.त्यानंतर ते २०१० मध्ये बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.२०१० ते २०२६ या कालावधीत ते महाविद्यालयाचे तब्बल १६ वर्ष प्राचार्य राहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी मा. रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली महाविद्यालयाच्या विकासात मोठे योगदान आहे.त्याच्या कारकिर्दी मध्ये त्यांनी महाविद्यालयांच्या परिसरामध्ये मोठया प्रमाणात वृक्षारोपण करून महाविद्यालयाच्या परिसराचे नंदनवन करण्यात त्याचा मोठा वाटा आहे.
त्याच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे तीन वेळा नॅक मूल्यांकन झाले आहे.त्यांनी महाविद्यालयाच्या कामात वेळोवेळी दाखवलेले कौशल्य आणि सामाजिक कार्यामध्ये तन-मन धनाने दिलेले योगदान, यामुळे डॉ.फावडे माधव प्राचार्य म्हणून संस्थेचे सचिव मा.रमेशरावजी आडसकर साहेब यांचे अतिशय विश्वासू प्राचार्य होते.त्यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवून महाविद्यालयासाठी अमूल्य योगदान दिले. प्राचार्य डॉ.फावडे माधव यांच्या सेवापूर्ती सोहळयाचे आयोजन दि. १६ जून २०२६मंगळवार रोजी दुपारी १-३० वाजता बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. सेवापूर्ती कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थी म्हणून श्री.पांडुरंग थोरात लेखाधिकारी शिक्षण विभाग बीड यांनी महाविद्यालयातील कृतज्ञता व्यक्त करून मनोगत व्यक्त केले.
श्री. छत्रपती शिक्षण संस्था नेहमीच निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या अध्यापकाच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करत राहते असे प्रतिपादन सौ.अर्चनाताई रमेशराव आडसकर यांनी व्यक्त केले. सेवापूर्ती सोहळ्याचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रोफेसर नवनाथ काशीद यांनी केले व आभार प्रदर्शन प्रोफेसर रामचंद्र केदार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला.



