साळेगाव येथील सतीश मुंडेचा खून,दारू पाजून कलाकेद्राला नेले बेशुद्ध आहे म्हणुन घरी सोडले.

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील साळेगाव येथील मित्राने गुरूवार दि.१२ फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजता त्याच्या मित्राला दारू पाजून धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात तमाशाची बारी पाहण्यासाठी नेले.परत येताना दहा वर्षापूर्वीचा बदला घेण्याच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीत सतीश मुंडे वय ३७ वर्षे याचा जीव गेल्यानंतर पहाटे त्याला त्याच्या घरी वडिलांजवळ सोडून,तो खूप दारू पिला आहे. त्यामूळे तो बेशुद्ध आहे. असे सांगून आरोपीनी तेथून पोबारा केला होता.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कला केंद्रात गुरूवारी दि. १२ फेब्रुवारी रोजी साळेगाव येथील गाडी चालकासह एकूण सहा जण साळेगाव येथून रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान गेले होते.पहाटे उशीरा साळेगावला येताना दहा वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून त्याच्या पाचही मित्रांनी सतीश मुंडे याला लाथा,बुक्क्यानीमारहाण केली.दरम्यान यात सतीश मुंडेचा प्राण गेला.
सतीश मुंडे चे वडील भागवत मुंडे यांनी सतीश ला रुग्णालयात नेल्या नंतर डॉक्टर यांनी तपासणी करून सतीश मुंडेला मयत घोषित केले.मृताचे वडील भागवत मुंडे यांनी येरमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादी नुसार जीपचालक शेख अजमोद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी,शकील शेख,संजय गिते,मधुकर इंगळे,व दत्ता तोंडे या पाच जणांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून केलेल्या मारहाणीत सतीश मुंडे याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आसून पाचही आरोपी विरुद्ध येरमाळा पोलिसात खुनाचा गून्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान,सतीश मुंडे हा त्याच्या वडिलांना एकुलता एक मुलगा होता.सतीशच्या पश्चात आई,वडील,पत्नी व सात वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.दरम्यान सतीश मुंडे खून प्रकरणा मुळे केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पाच ही आरोपीला पोलिस कोठडी.
सतीश मुंडे याचा खून केल्या प्रकरणी येरमाळा पोलिसानी शनिवारी पाच ही आरोपीना अटक करून कळंब येथील न्यायालयात हजर केले आसता गाडीचालक शेख अजमोद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी,शकील शेख,संजय गिते,मधुकर इंगळे व दत्ता तोंडे या पाचही आरोपीना कळंब न्यायालयासमोर हजर केले असता पाच ही आरोपीना दि.१८ फेब्रुवारी पर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.

