सामाजिक

बापाचं काळीज मुलासाठी बापाचं देणं कधीच फिटत नाही!बीड येथील रेणू हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुरेश मुंडे यांनी मांडले भावूक विचार!

केज/प्रतिनिधी

एक बाप आपल्या मुलासाठी आयुष्यभर झटत असतो,स्वतःच्या सुखाचा त्याग करून मुलाच्या भविष्यासाठी पाया रचत असतो.पण मुलासाठी कितीही केलं, तरी बापाचं मन कधीच भरत नाही आणि मुलासाठी त्याचं देणं कधीच पुरत नाही,असे हृदयस्पर्शी उद्गार बीड येथील प्रख्यात रेणू हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुरेश मुंडे यांनी काढले.

पितृत्व आणि मुलाप्रती असलेल्या कर्तव्यावर भाष्य करताना डॉ.मुंडे यांनी पितृत्वाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला.ते म्हणाले की, समाजात आईच्या माये बद्दल खूप बोलले जाते, पण बापाचा संघर्ष अनेकदा पडद्यामागेच राहतो.बाप हा नारळा सारखा असतो,जो बाहेरून कठीण असला तरी आतून मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत हळवा असतो.बापाचा संघर्ष अन् मुलाचंभविष्य

डॉ.मुंडे पुढे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात मुले मोठी होतात, शिकतात,स्वतःच्या पायावर उभी राहतात. पण एक बाप म्हणून त्याला नेहमीच वाटत राहतं की आपल्या मुलासाठी आपण अजून काहीतरी करायला हवं होतं.मुलाला जगातील सर्व सुखसोयी मिळाव्यात,ही जिद्द बापाला शेवटच्या श्वासा पर्यंत स्वस्थ बसू देत नाही.

डॉक्टरांचा सल्ला-संवाद जपा

केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे,तर सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. सुरेश मुंडे यांची ओळख आहे.याच निमित्ताने त्यांनी तरुण पिढीलाही आवाहन केले की,तुमचा बाप तुमच्यासाठी जे काही करतो,त्यामागे त्याचे अफाट कष्ट असतात.मुलांनीही आपल्या वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्याशी प्रेमाचा संवाद राखणे हीच त्यांच्यासाठी खरी गुरुदक्षिणा ठरेल.

रेणू हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करताना अनेकदा कौटुंबिक नातेसंबंधांचे विविध पदर पाहायला मिळतात,त्या अनुभवातूनच हे विचार मांडल्याचे डॉ.सुरेश मुंडे यांनी नमूद केले. त्यांच्या या विधानाची सध्या बीडच्या सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा होत असून,अनेकांनी या भावूक विचारांचे स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!