कृषीसामाजिक

शेतकऱ्यांचा होळ येथे महामार्गावर चक्काजाम आंदोलनांने एक तास वाहतूक रोखली, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त,केज तहसील कार्यालयावर टायर जाळून इशारादिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीड -अंबाजोगाई-लातूर महामार्ग रोखला,शेकडो शेतकरी रस्त्यावर 

केज/प्रतिनिधी

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या बुलढाणा येथील बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली दि.१७ जून रोजी सकाळी ११वाजता बीड-अंबाजोगाई-लातूर महामार्गावर होळ येथे एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहूल खोडसे यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला.

सकाळी ११ वाजल्या पासून शेकडो शेतकरी होळ गावाजवळील राज्य महामार्गावर एकत्र आले.महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.आंदोलकांनी शेतकरी जिंकणारच, रविकांत भाऊ तुम आगे बढो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या दहा प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने पार पडले.यावेळीजिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.ते म्हणाले की,काल आम्ही केज तहसील कार्यालयासमोर टायर जाळून निषेध नोंदवला.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही,तर उद्या सरकारची खुर्ची जळायला वेळ लागणार नाही.गांधीजीं च्या मार्गाने ऐकत नसाल तर शहिद भगतसिंगांचा मार्ग अवलंबावा लागेल. रविकांत भाऊंचा जीव टांगणीला लागला आहे. सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी, २०२५ चा खरीप १७५०० रुपये हेक्टरी पिकविमा आणि १०० टक्के नुकसान भरपाई जाहीर करावी.अन्यथा हा लढा आणखी तीव्र करू चक्का जाम आंदोलनात तालुकाध्यक्ष दिलीप लोंढे,अतुल गवळी,सतीश शिंदे, हरिभाऊ आघाव,दिगंबर तपसे,पंडीत शिंदे,सुनील कापरे,भारत धपाटे, सुग्रीव करपे,उमेश गायकवाड,यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!