गुन्हेगारी

हनुमंत पिंपरीत तरुणाची निर्घृण हत्या ; एक संशयित ताब्यात,कारण अस्पष्ट 

 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी शिवारात २५वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव वय २५ असे मृत तरुणाचे नाव आहे. केवड व हनुमंत पिंपरी शिवाराच्या हद्दीत विक्कीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.अज्ञात हल्लेखोराने तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार केल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.सदरील

घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,उप विभागीय पोलीस अधिकारी व्यंकटेश देशपांडे,पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे,महेश क्षीरसागर,पोलीस उप निरीक्षक उमेश निकम, इनामदार व अशोक सोनवणे यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला. तांत्रिक तपासाच्या मदतीने वेगाने तपास सुरू आहे.

एक संशयित ताब्यात या प्रकरणी पोलिसांनी महेश चंदनशिव या संशयिताला ताब्यात घेतले आहे.हा खून जुन्या वादातून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!