सामाजिक
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ धाराशिव बीड लातूर महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांची दिंद्रुड येथे भेट

दिंद्रुड/प्रतिनिधी
दि.१५ जुन २०२६ रोजी स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ धाराशिव बीड लातुर महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील हे डॉ.ओमप्रकाश शेटे आयुष्यमान भारत चे महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या दिंद्रुड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यासाठी आले असता भारतीय नरेंद्र मोदी संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. भाऊसाहेब घोडके यांनी नमो संघाचा गमछा पट्टी देउन बसवराज पाटील यांचा सन्मान सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस नमो संघाकडुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी माजलगाव सह दिंद्रुड पंचक्रोशीतील भाजपाचे मुख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



