शैक्षणिकसामाजिक

संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव आनंदात साजरा -बबनराव आंधळे

बीड /प्रतिनिधी

अरुणा असफली महिला मंडळ बीड संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तेलगाव रोड बीड या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा आणि आनंद उत्सव साजरा करण्यात आला.इयत्ता पहिली च्या वर्गात नवीन प्रवेश घेणारे विद्यार्थी तसेच अनेक जुने आणि नवीन आलेले विद्यार्थी यावेळी शाळेमध्ये उपस्थित होते शाळेचा परिसर सुंदर स्वच्छ पाहून विद्यार्थ्यांना आनंद झाला जुन्या मित्रांना नवीन मित्र भेटले त्या भेटीने मुले गहिवरून गेली.

शाळेमध्ये रांगोळी आणि वेगवेगळ्या पोज देत विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला शाळेचे मुख्याध्यापक बबनराव आंधळे सर यांच्यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच नवीन वर्गाची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर ही वाटप करण्यात आले व शेवटी खाऊ वाटप करून शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांनी शाळेचा पहिला दिवस अगदी आनंदामध्ये घालवला विद्यार्थ्यांच्या या सर्वांगीण विकासासाठी या परिसरातील अनेक पालकांनी असे ठरवले आहे की,या वर्षी आपण संत तुकाराम प्राथमिक विद्यालयांमध्येच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करायचा पालकाच्या या सहकार्याबद्दल सर्व पालकाचे शाळेचे मुख्याध्यापक बबनराव आंधळे सर यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!