अपघातसामाजिक

केज चे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाताची चौकशी करण्यात यावी,प्रितम खरात यांची मागणी 

केज/प्रतिनिधी

केज चे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा रेणापूर फाट्याजवळ अचानक गाडीचा अपघात झाल्याची बातमी ही सर्व केज तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक तसेच सर्व कर्मचारी यांना एक प्रकारे झोपेत दगड पडावा अशी वाऱ्या सारखी पसरली.

अपघात होण्याच्या दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत त्यांचे कोणासोबत कॉल या व्हॉट्सअप कॉल वर बोलणे झाले आहेत. याची सर्व कॉल रेकॉर्ड काढावे तसेच ज्या क्षणी ते लातूर हायवे लगत जो टोलनाका आहे तो किती वाजता पार केला त्याचा सीसीटीव्ही तपासून पोस्टमार्टम रिपोर्टनुसार अपघात किती वाजता झाला याची डिटेल डॉक्टर यांनी नोंद केली असेल त्या प्रमाणे तपासून जो कालावधी त्यांच्या गाडीने टोलनाका पारकेल्यापासून अपघात स्थळ आहे तिथपर्यंत जायला किती टाईम लागतो. जर अपघात झाल्याचा टाईम आणि टोलनाका टाईम यामध्ये किती अंतर होते तर ते अंतर पार करण्यासाठी मोजून दहा ते पंधरा मिनिटे लागतात.

जर या कालावधीत काही तफावत असेल तर मधल्या वेळात त्यांची गाडी कोणत्या ठिकाणी थांबली होती का? कोणी सोबत होते का?जर कुठ थांबले असतील तर रोड लगत असलेली हॉटेल असतील या दुकाने यामध्ये त्यांच्या गाडी मागे कोणाची गाडी पाठलाग करताना दिसून येते का?यासाठी जेवढे रोड लगत कॅमेरा बसवलेले असतील हॉटेलची या दुकाने यांची तर ते पूर्ण तपासून घ्यावी जेणेकरून या प्रकरणाचा छडा लागेल,जर काही आढळून आले तर योग्य ती चौकशी करावी असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.चौकशी ही एस आय टी मार्फत करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केज तालुका उपाध्यक्ष प्रितम खरात यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!