केजमध्ये सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला सोनवणे बंधूंचा वाढदिवस

केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरव दादा सोनवणे व गौरव भैय्या सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त केज शहरात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.शनिवार,दि.२ मे २०२६ रोजी पार पडलेल्या याउपक्रमांमुळे वाढदिवसाला समाजसेवे ची जोड मिळाली. उपजिल्हा रुग्णालय,केज येथे रुग्णांना फळांचे वाटप तसेच नवजात बालकांसाठी बेबी शॉलचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाला नागरिकां कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच दर्गा येथे चादर अर्पण करून सर्वांच्या सुख-समृद्धी साठी प्रार्थना करण्यात आली.त्यानंतर बालाजी मंदिर,केज येथे दर्शन घेऊन धार्मिक वातावरणात कार्यक्रम पार पडला.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धारूर चौक येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून,हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.एकूणच,सोनवणे बंधूंचा वाढदिवस साधेपणाने पण समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याने सर्व स्तरातून त्याचे स्वागत करण्यात आले.



