शैक्षणिक

साने गुरुजी निवासी विद्यालयात प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी

साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळेच्या पहिल्या दिवशीचा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात श्री.राजू वडवले वर्ग दोन इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालय बीड यांच्या उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव कराड सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. इयत्ता पहिली प्रवेशित विद्यार्थ्यांचे पावलाचे ठसे घेऊन,विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी टोप्या घालून, चॉकलेट व फुल देऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशद्वारा तून प्रवेश करण्यात आला.

तसेच विद्यार्थ्यांची वजन,उंची घेऊन विकास पत्रावरती भरून घेण्यात आली त्याच बरोबर वेगवेगळे स्टॉल जसे की गणन पूर्व तयारी,पक्षी प्राणी चित्र जोड्या,भाषा वाचन पूर्व तयारी, शारीरिक खेळ इत्यादी स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण निर्माण करून देण्यात आले होते. शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी च्या उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व दप्तर (सॅक) चे वाटप मा. वडवले साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करून चॉकलेट, टोपी,फुगे देऊन स्वागत मोठ्या उत्साहात संगीताच्या तालावर करण्यात आले.इयत्ता पहिली प्रवेशित मुलांच्या पायाच्या पावलांचे ठसे वेगवेगळ्या रंगाने घेऊन संग्रहित करण्यात आले. त्याचबरोबर सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सेल्फी घेण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती.पालकांचे ही शब्दसुमनांनी व फुल देऊन स्वागत केले. उपस्थित पालकांना मा.वडवले साहेबांनी मार्गदर्शन करून उद्याची भावी पिढी शिक्षण घेऊन जगाला स्वीकार्य अशी बनेल यासाठी शाळेला, शिक्षकांना सहकार्य करण्याची आवाहन केले.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे अशीही आदेशित केले.साने गुरुजी निवासी विद्यालय हे एक आदर्श विद्यालय आहे असे गौरवोउद्गार काढून सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रा.डॉ. कविता गित्ते मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.गुजर एन.जी यांनी केले.सर्व शिक्षकांनी अतिशय छान पद्धतीने शिक्षणोत्सव संपन्न केल्याबद्दल संस्था अध्यक्ष ॲड . उद्धवरावजी कराड सर यांनी सर्वांचे अभिनंदन केले व नवीन शैक्षणिक वर्षांच्या विद्यार्थी सर्व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.आभार श्री.साखरे सर यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!