उद्योगसामाजिक

संघर्षातून उभी राहिलेली नवी दिशा EBAL Innotech Pvt.Ltd.ची प्रेरणादायी सुरुवात

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथील भुमीपुत्र श्री.मनोज राजेंद्र उखंडे यांनी संघर्ष,जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर “EBAL Innotech Pvt. Ltd.” या स्टार्टअपची स्थापना करत तरुणांसमोर प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.भारत सरकारच्या DPIIT मान्यताप्राप्त या स्टार्टअपचे कार्यक्षेत्र शिक्षण व कौशल्य विकास आहे.मर्यादित साधने,प्रतिकूल परिस्थिती आणि अनिश्चिततेवर मात करत उभारलेला त्यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यश नसून नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे.

जीवनात अनेक प्रसंग असे आले की,जिथे बहुतांश लोक थांबले असते,परंतु श्री.मनोज उखंडे यांनी प्रत्येक वेळी परिस्थितीपेक्षा स्वतःच्या Inner Strengths वर विश्वास ठेवला.कारण माणूस परिस्थितीमुळे हरत नाही,तर स्वतःच्या क्षमतेवरील विश्वास हरवल्यामुळे थांबतो. त्यांचा जीवनप्रवास याच सत्याची साक्ष देतो.

IIT Bombay येथून M.Tech (Mechanical) पदवी प्राप्त केलेल्या मनोज उखंडे यांनी भारत फोर्ज या जागतिक कंपनीच्या संशोधन व विकास विभागात १८ वर्षे कार्य केले.त्यानंतर विलो या आंतरराष्ट्रीय कंपनीत दोन वर्ष वरिष्ठ पदावर काम करत जागतिक औद्योगिक अनुभव मिळवला. सुरक्षित करिअर आणि उच्च पदाचा मार्ग निवडण्या ऐवजी त्यांनी समाजा साठी मूल्यनिर्मितीची वाट स्वीकारली.

त्यातूनच “EBAL Innotech Pvt. Ltd.” ची निर्मिती झाली.EBAL (ईबल) ही केवळ कंपनी नसून Experience-Based Advanced Learning या संकल्पने वर आधारित उपक्रम आहे.आज अनेक विद्यार्थ्यांकडे पदवी असली तरी उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक व्यावहारिक कौशल्ये, समस्या सोडविण्याची क्षमता,टीमवर्क आणि आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो.दुसरीकडे उद्योगांना इंडस्ट्री- READY मनुष्यबळाची गरज आहे.अकॅडमी आणि इंडस्ट्री यांतील ही दरी भरून काढण्याचे काम EBAL करणार आहे.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगानुभवाशी जोडणे, इंडस्ट्री-READY टॅलेंट घडवणे,कार्यरत व्यावसायिकांना अद्ययावत कौशल्ये उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थी, शिक्षक व उद्योगतज्ज्ञांना एकत्र आणणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आजच्या युगात माहिती पेक्षा अनुभव,निर्णय क्षमता, नवोपक्रमशीलता आणि बदल स्वीकारण्याची तयारी अधिक महत्त्वाची आहे. EBAL ही याच भविष्याची तयारी घडवणारी संकल्पना आहे.हा उपक्रम केवळ व्यवसाय नसून रोजगार निर्मिती,कौशल्यविकास, नवोपक्रम संस्कृती आणि Sustainable Development Goals यांना बळकटी देणारा सामाजिक प्रयत्न आहे. श्री.मनोज उखंडे यांचा प्रवास प्रत्येक तरुणाला एक संदेश देतो की,परिस्थिती पेक्षा तुमची Inner Strengths मोठी असतात.स्वतःवर विश्वास ठेवा,यश आणि संधी दोन्ही तुमचे दरवाजे ठोठावतील.आजची ही सुरुवात एका कंपनीची नसून अनेक स्वप्नांना दिशा देणाऱ्या नव्या विचारांची आहे.

श्री.मनोज राजेंद्र उखंडे (मो. 8600152494, ई-मेल : manojukhande555@gmail.com), EBAL Innotech Pvt. Ltd., Office No. 2526,T-9, Bramhacorp Business Park, New Kalyani Nagar,Wadgaon Sheri,Pune – 411014.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!