
केज/प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था,आडस संचलित लोकनेते स्व. बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज येथील प्राचार्य डॉ. फावडे माधव ग्यानोबा हे तब्बल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेच्या गौरवार्थ आज, मंगळवार दि.१६ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११-३० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य ‘सेवापूर्ती सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.रमेशराव जी आडसकर साहेब यांची लाभणार आहे. डॉ.माधव फावडे यांनी आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आहेत.त्यांच्या याच कृतज्ञतेपोटी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास जिल्ह्यातील शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह आजी- माजी विद्यार्थी,प्राध्यापक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन डॉ. फावडे माधव ग्यानोबा व परिवार,तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.



