सामाजिक

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची वैभव स्वामी यांनी घेतली सदिच्छा भेट,पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे दिले आमंत्रण 

मुंबई/प्रतिनिधी

बीडच्या पालकमंत्री महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उप मुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन बारामती पोट निवडणुकी मध्ये ऐतिहासिक विजया साठी शुभेच्छा देवून दादांच्या स्वप्नातील विकसनशील बीड जिल्ह्याचे पालकत्व आपण पूर्ण करावे असे पत्रकारांच्या वतीने साकडे घातले.यावेळी दैनिक समर्थ राजयोगचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आमंत्रण दिले.यावेळी त्यांनी पत्रकार संघाच्या बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्याला उपस्थित राहण्याचा शब्द दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!