सामाजिक

संत महंत यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस साजरा 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक,भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दगडु भाऊ दळवे यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर,सर्वांच्या सुख दुःखात नेहमी सहभाग असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून यांची ओळख आहे वाढदिवसाचे तसेच अधिक मासाचे औचित्य साधून केज परिसरातील अनेक महाराज मंडळी च्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

यावेळी भागवत भुषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री श्रीकृष्णाश्रम केज,वै. श्रीधर नाना यांचे सुपुत्र ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पिंपरीकर व त्यांचा परीवार,ह.भ.प. विष्णू महाराज शास्त्री, ह.भ.प.सुनिल महाराज गालफाडे,ह.भ. प. सौ. शारदाताई गालफाडे श्रीविठ्ठल जनाई वारकरी शिक्षण संस्था चिंचोली माळी,श्रीक्षेत्र उत्तरेश्वर मंदिर पुजारी,ह.भ.प. भाऊसाहेब मोकाशी सपत्नीक,ह.भ.प. संभाजी महाराज कदम, ह.भ.प.संजय महाराज नखाते,ह.भ.प.आबा महाराज मेहरकर, ह.भ.प.रवी महाराज गायकवाड,ह.भ.प.पंढरीनाथ काळे,तसेच दिलीप गायकवाड सर, राजाभाऊ भुजबळ, राजाभाऊ नखाते, मोहनराव बर्डे इत्यादी मित्र मंडळी देखील उपस्थित होती.वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!