सामाजिक

तहसीलदार राकेश गिड्डे अपघात प्रकरणी सखोल चौकशीची मागणी; संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

केज/प्रतिनिधी

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सखोल,निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी,अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,राकेश गिड्डे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे अधिकारी होते.त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण केज तालुका व बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.मात्र, त्यांच्या मृत्यू विषयी निर्माण झालेल्या संशयास्पद परिस्थिती मुळे हा अपघात आहे की घातपात,याबाबत जनतेत शंका निर्माण झाली आहे.

विशेषतः अपघातानंतर घटनास्थळावरून मोबाईल फोन व महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच,अपघाताच्या दिवशी त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींचे मौनही संशय अधिक गडद करणारे असल्याचे म्हटले आहे.या पार्श्वभूमी वर,संपूर्ण घटनेचीसखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी,तसेच आवश्यक असल्यास उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणा ची सत्यता लवकर समोर येणे हेच दिवंगत अधिकाऱ्याला खरी श्रद्धांजली ठरेल,असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.हे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे यांच्या नेतृत्वा खाली देण्यात आले.

यावेळी महेंद्र मोरे विभागीय उपाध्यक्ष, राहुल डावकर तालुका अध्यक्ष बीड,नितीन गुजर,जीवन घोलप शहर अध्यक्ष पाटोदा आदी उपस्थित होते व त्यांनीही या निवेदनावर सह्या करून प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!