
केज/प्रतिनिधी
विडा येथिल शिवरामपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ६० कोटींच्या ठेवी असून त्यापैकी पतसंस्थेने एकूण ५० कोटींचे कर्ज वाटप केले आहे. पतसंस्थेने २३ कोटींची गुंतवणूक केली आहे. पतसंस्थेकडे सध्या ४ कोटींचा स्वनिधी आहे. दरम्यान पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात ३० लाखांचा निव्वळ नफा झाला असून पतसंस्थेच्या विडा, सारूळ(बरड), चिंचोली माळी,येवता, वाघेबाभूळगाव, नेकनूर,धारूर,केज,युसूफ वडगाव,वडवणी, चौसाळा येथे एकूण ११ शाखा कार्यरत आहेत.
तसेच पतसंस्था लवकरच ७० कोटींच्या पुढे वाटचाल करणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब मुळे यांनी दिली आहे.बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांनी विडा येथे शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली होती. पतसंस्थेने कृष्णा को- ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे व युवा नेते अतुल दादा मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली ग्राहकांचा विश्वास संपादन करत यशस्वीरित्या वाटचाल केली आहे.त्यामुळे पतसंस्थेने अत्यंत अल्पावधीत ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर उत्तुंग भरारी घेतली असून पतसंस्थेने ६० कोटींच्या पुढे वाटचाल केली आहे.
पतसंस्थेला उत्तम व्यवस्थापनाबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ,खातेदार, ठेवीदार,सभासद,हित चिंतक व ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात ६० कोटींच्या ठेवी प्राप्त झाल्या असून त्यापैकी पतसंस्थेने ५० कोटींचे कर्ज वाटप केले आहे.या माध्यमातून पतसंस्थेने कर्जदारांना विविध व्यवसाय उभारून स्वतःच्या पायावर उभे राहण्या साठी मदत केली आहे. दरम्यान पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात ३० लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीता पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चौरे सर्व शाखेचे शाखा व्यवस्थापक,सर्व शाखेचे कर्मचारी यांनी उत्तम कर्तव्य बजावत असून पतसंस्था लवकरच ७० कोटींच्या पुढे वाटचाल करणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब मुळे यांनी दिली आहे.



