
केज/प्रतिनिधी
केज शहरातील कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने १०० कोटींचा टप्पा पार केला असून त्यापैकी बँकेने ६१ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.२३ कोटी रूपये बँकने गुंतवणूक केली आहे.बँकेकडे सध्या ८ कोटींचा स्वनिधी आसून बँकेचा ग्राॅस एनपीए २.९८% तर निव्वळ एन पी.ए १.६४ % इतका आहे.दरम्यान बँकेला यावर्षी ७५ लाखांचा निव्वळ नफा झाला असून बँकेच्या केज, बीड,माजलगाव, नांदूरघाट, कळंब,शिरूर (का) येथे एकुण ६ शाखा कार्यरत आहेत.तसेच लवकरच बॅंकेच्या सर्व शाखेतून मोबाईल बँकिंग,यूपीआय, फोन पे,गुगल पे खातेदारांच्या सेवेत सुरू होणार आहे. दरम्यान हजारो सभासद, ठेवीदार आणी ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर बँकेने १०० कोटींचा ऐतिहासिक टप्पा सर केला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे यांनी दिली आहे.
बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे यांनी केज शहरात २८ वर्षांपूर्वी कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली होती. बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे यांच्या कूशल मार्गदर्शनाखाली स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या बळावर बँकेने अल्पावधीतच यशस्वी भरारी घेतली असून बँकेने १०० कोटींच्या पुढे वाटचाल केली आहे.बँकेला मागील कित्येक वर्षां पासून राज्य पातळीवर विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.बँकेचे हितचिंतक, खातेदार,ठेवीदार, सभासद व ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर बँकेला आर्थिक चालु वर्षात १०० कोटींच्या ठेवी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६० कोटींचे कर्ज वाटप केले आहे.
या माध्यमातून बँकेच्या कर्जदारांना विविध व्यवसाय उभारून स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे.तर बँकेला चालु आर्थिक वर्षात ७५ लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेवराव मुंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी जाधव,सर्व शाखेचे शाखा व्यवस्थापक,सर्व शाखेचे कर्मचारी उत्तम कर्तव्य बजावत असून लवकरच ग्राहकांच्या सेवेत बँक मोबाईल बँकिंग, यूपीआय,फोन पे,गुगल पे सुरू करत असून बँकेने १०० कोटींची ऐतिहासिक वाटचाल केल्याची माहिती बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे यांनी दिली आहे.
विजयकांत मुंडेंचे मार्गदर्शन अन बँकेची उत्तुंग भरारी!
बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे यांनी केज शहारात २८ वर्षांपूर्वी कृष्णा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली होती. बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादीत करून स्वच्छ व पारदर्शक कारभार करत १०० कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.तसेच बँकेला राज्य पातळीवर विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



