सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) यांचे शासकीय आय.टी.आय कॉलेज बार्शी लिमिटेड मार्फत एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

बार्शी/प्रतिनिधी
दि.18 डिसेंबर 2025 रोजी भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड मार्फत शासकीय आय.टी.आय कॉलेज बार्शी येथे एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम आय.टी.आय च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य श्री.प्रदीप हरिदास सर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून (सेबी) तसेच सी.डी.एस.एल.चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सरयांनी उपस्थित विद्यार्थिनींना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी विद्यार्थांना सेबी तसेच सी.डी.एस.एल ची कार्य प्रणाली विशद केली. तसेच बचत व बचतीचे महत्त्व समजावून सांगितले.
राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या विविधयोजना, डिमॅट अकाउंट, शेअर मार्केट,म्युच्युअल फंड व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले.तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्या साठी कॉलेजचे उपप्राचार्य श्री.युवराज मढेकर सर यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन व सूत्र संचालन केले.या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



