श्री छत्रपती राजर्षी शाहू बँकेची नेत्रदीपक कामगिरी ; २७ कोटी ४४ लाखांचा विक्रमी नफा!

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि.’ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.दि.३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने २७ कोटी ४४ लाख रुपयांचा भरघोस नफा मिळवून सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. सातत्यपूर्ण नियोजन आणि पारदर्शक कामकाजामुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाल्याचे बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
आर्थिक स्थितीवर एक नजर
बँकेने दिलेल्या माहिती नुसार,सध्या महाराष्ट्र राज्यात बँकेचे ४६ शाखांचे जाळे विस्तारलेले आहे.बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून त्याची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
एकूण ठेवी- १५४८२३.६९ लक्ष रुपये
एकूण कर्ज- ९२९२३.१७ लक्ष रुपये
भाग भांडवल- ४६१४.८५ लक्ष रुपये
एकूण व्यवसाय- २४७७४६.८६ लक्ष रुपये
ढोबळ नफा (Gross Profit)-२७४४.१७ लक्ष रुपये
एनपीए (NPA) मध्ये बाजी
बँकेने थकीत कर्जाच्या बाबतीत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए NPA २.४९% असून, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँकेने सलग चार वर्षांपासून नेट NPA ०% (शून्य टक्के) राखला आहे.ही बाब बँकेच्या आर्थिक शिस्तीचे दर्शन घडवते.
सभासद आणि ग्राहकांचे आभार
बँकेचे सभासद संख्या २११५१ असून,या यशाचे श्रेय बँकेचे अध्यक्ष मा.इंजि.अजय अर्जुनराव पाटील, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने सर्व सभासद,कर्जदार, ठेवीदार,ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच बँक ही उंची गाठू शकली,अशा भावना व्यक्त करत बँकेने सर्वांचे आभार मानले आहेत.अत्याधुनिक युगात ग्राहकांनी डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.



