शैक्षणिक

केज शहरातील रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

केज/प्रतिनिधी

केज शहरातील रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल दि.१४ डिसेंबर ते १७ तीन दिवसीय सहल भीमाशंकर- लेण्याद्री- ओझर- शिवनेरी- नाशिक त्रिंबकेश्वर- भंडारदरा -कळसुबाई- शिर्डी – शनि शिंगणापूर- मोहटा देवी आदी ठिकाणी भेटी देऊन संपूर्ण झाली.यादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध स्थळाबद्दल भौगोलिक ऐतिहासिक माहिती देऊन त्यांच्या अभ्यासक्रमा इतर उपक्रमात भर घातली.

सहलीमध्ये मुलांनी ऐतिहासिक,भौगोलिक, नौकानयन,धार्मिक- सांस्कृतिक स्थळी निसर्गाच्या सानिध्यामध्ये विद्यार्थ्यांना अनुभूती मिळाली विद्यार्थ्यांनी स्थानिक खाद्य पदार्थांचा यथेच्छ लाभ घेतला.या सहलीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महा मंडळाच्या लालपरी बस मधून प्रवास झाला.एसटी चालक श्री.थोरात यांनी सुरक्षित पद्धतीने गाडी चालवली.सहलीच्या नियोजनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री.खोसे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.सहल यशस्वी करण्यासाठी गोरे सर,देशमुख सर,देवकते सर,टोपे सर,कळेकर सर, नाईकनवरे सर,शिंपले सर यांनी परिश्रम घेतले.या सहली मुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!