वाणिज्य

तांदळवाडी येथे मल्टी कमोडिटी एक्सचेंज एम. सी.एक्स मार्फत बचत गटातील महिलांना निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

बीड/प्रतिनिधी

दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी तांदळवाडी तालुका धारूर येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच एम. सी.एक्सच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन सौ. अनिता पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच एम.सी.एक्स चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सर यांनी उपस्थित महिलांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी महिलांना बचत,आर्थिक नियोजन व त्याचे महत्त्व, डिमॅट अकाउंट, फायनान्शियल मार्केट्स, कमोडिटीचे प्रकार, जागतिक स्तरावर सक्रिय असलेल्या कमोडिटीज (सोने,चांदी) यांची मागणी व येणाऱ्या काळात त्यात होणाऱ्या भाव वाढीचे बदल,वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट,कमोडिटी वइक्विटी मध्ये असलेला फरक, तसेच सेबीच्या सारथी ॲप चे महत्व इत्यादीचे मार्गदर्शन केले.तसेच गुंतवणूक करत असताना महिलांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्या साठी सौ.मोहर भिसे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन केले. तर सूत्रसंचालन सौ. निर्मला साखरे मॅडम यांनी केले.तसेच या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!