गुन्हेगारी

लग्नाचे आमिष दाखवून आठ महिन्यापासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार,नराधमावर केज पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल 

केज/प्रतिनिधी

केज पासून जवळच असलेल्या एका खेडेगावात दोन वर्षां पासून सालगडी म्हणुन काम करणाऱ्या इसमाच्या इयत्ता ८ वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तब्बल आठ महिन्यापासून अत्याचार करणाऱ्या एका नराधमा विरुद्ध पीडितेच्या फिर्यादीवरून केज पोलिसात पोक्सो अंतर्गत गून्हा नोंद झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,

विदर्भातील एका खेड्यातील सालगाडी हा केज पासून जवळच असलेल्या एका खेड्यातील शेतकऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणुन काम करीत आहे.त्याच्या भागातीलच दुसरा सालगडी केज येथील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणुन काम करीत असून,दोघे एकाच भागातील असल्यामुळे एकमेकांकडे त्यांचे येणे जाणे व्हायचे यातूनच इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दि.१ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री पासून ते दि.१४एप्रिल २०२६ च्या दुपारी १२ वाजेपर्यंत सातत्याने अत्याचार केला.

ही माहिती कोणाला सांगितलीस तर तुझ्या वडीलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.याप्रकरणी दि.१४ एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी पीडितेच्या फिर्यादीवरून भालशंकर रा.बुलढाणा जिल्हा ह.मु. केज याच्या विरुद्ध पोक्सोचा गून्हा केज पोलिसात नोंद झाचा असून,पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!