श्रीकांत घुले उमरी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार?

केज/ प्रतिनिधी
स्थानिक राजकारणा मध्ये सध्या चर्चा रंगली आहे की,उद्योजक श्रीकांत घुले यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी उमरी गणातून उमेदवारी घ्यायची तयारी चालू ठेवलीआहे.गावात आणि आसपासच्या परिसरात स्थानिक जनता,कार्यकर्ते तसेच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरु आहे की,जर श्रीकांत घुले मैदानात उतरले तर ते निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतात. श्रीकांत घुले यांच्या मागे राजकीय पाठबळ व समाजात त्यांची ओळख,यामुळे निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीने स्थानिक व मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
जर ते निवडणुकीत उतरणार हे स्पष्ट झाले,तर उमरी पंचायत समिती गणातील सर्व मतदार, पक्ष आणि नागरिकांचे मत सुद्धा बदलू शकते या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांतच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सुत्रांकडून व्यक्त होत आहे.
शैक्षणिक संस्था, वेदांत कलेक्शनच्या माध्यमातून वाढता जनसंपर्क याचा उमरी पंचायत समिती निवडणुकीत होऊ शकतो फायदा .
स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्था,वेदांत कलेक्शन या व्यवसायाच्या माध्यमातून सुरू असलेला दांडगा जनसंपर्क आगामी उमरी पंचायत समिती निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी चर्चा सध्या गावोगावी रंगत आहे. विविध सामाजिक कार्याच्या जोरावर श्रीकांत घुले यांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
ग्राहकांना उत्तम सेवा, विविध योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा फायदा आणि लोकांशी राखला जाणारा सातत्यपूर्ण संपर्क यामुळे वेदांत कलेक्शनचे नाव गावा गावात घराघरात पोहोचले आहे.त्यामुळे या जनसंपर्काचा थेट फायदा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी करणाऱ्या संबंधित श्रीकांत घुलेना मिळू शकतो,असे मत व्यक्त केले जात आहे.
सध्या उमरी परिसरात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून,जनतेचा पाठिंबा कोणाच्या बाजूने झुकतो याची उत्सुकता वाढली आहे.व्यवसायातून निर्माण झालेला लोकांचा विश्वास व प्रत्यक्ष संपर्क या घटकांचा निवडणूक निकालावर प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकार सांगतात.
उमरी पंचायत समितीचा विश्वास संपादन करण्या साठी असलेली ही स्पर्धा कोण जिंकणार,हे येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान उमेदवारी मिळाली तर श्रीकांत घुले यांचा प्रभाव मतदानातून दिसून येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.



