शैक्षणिकसामाजिक

मोबाईल मुळे आजच्या तरुण पिढीचा यांचा नात्यातील संवाद हरवला आहे- अँड.उद्धवराव कराड

केज/प्रतिनिधी

केज येथील साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक, उच्चमाध्यमिक विद्यालय,नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था येथील तरुण युवा युवतींना समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला होता.याप्रसंगी व्यासपीठा वर मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष अँड. उद्धवराव कराड यांनी सांगितले की,आजच्या तरुण पिढीचा व पुर्वीच्या पिढीमधील फरक सांगितला की,आज तुम्ही जो मोबाईल पाहता त्यात तुम्हाला मागेल ते भेटते पण आमच्या काळात दुरदर्शन असायचे त्यावर आम्ही समाधानी होतो पण आज तुम्हाला एवढे मोठे साधन इंटरनेट, मोबाईल मिळाला आहे पण तुम्ही अनावश्यक त्या मधुन घेता.

आजच्या तरुण पिढीचा संवाद संपला आहे.आजचा तरुण एकल कोंडा झाला आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून संकुलाच्या प्राचार्या डॉ. कविता गित्ते-कराड मॅडम यांनी पण मुलांना मनोगत व्यक्त करताना सांगितले की,वाढत्या वया मध्ये मुलांमध्ये होणारे बदल शारीरिक,मानसिक, भावनिक बदल या विषयी मुलांना सविस्तरमार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती वडमारे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाला श्री.पवार सर,दस्तुरे सर यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!