सामाजिक

महात्मा बसवेश्वर समतेचे दुत – डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दि. १९ एप्रिल २०२६ रोजी महात्मा बसवेश्वर जयंती, श्री.परशूराम जयंती, अक्षयतृतीया निमित्त व्याख्यान,कविता लेखन व वाचन,बेडूक उड्या आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

महात्मा बसवेश्वर हे समतेचे दूत होते असे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.प्रमुख व्याख्याते म्हणून आनंद भैय्या गायकवाड यांचे व्याख्यान झाले.कविता लेखन व वाचन स्पर्धेत यशवंत सौदागर,नम्रता गायकवाड, वेदिका गायकवाड,शिवम गायकवाड यांनी सहभाग घेतला तर बेडूक उड्या स्पर्धेत शिवम गायकवाड, नम्रता गायकवाड, वेदीका गायकवाड,कृष्णा गायकवाड,यशवंत सौदागर,नंदिता गायकवाड यांनी सहभाग घेतला.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड,ए.बी. गायकवाड,संभाजी लवटे,कमलाकर साबळे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक ,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. आनंद भैय्या गायकवाड यांचे सुश्राव्य व्याख्यान झाले.कविता लेखन व वाचन स्पर्धेत यशवंत सौदागर यांचा प्रथम क्रमांक आला.बेडूक उडी स्पर्धेत यशवंत सौदागर प्रथम,नम्रता गायकवाड – द्वितीय तर वेदिका गायकवाड यांचा तृतीय क्रमांक आला.विजेत्यांना प्रमाणपत्र देवून डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!