सामाजिक

भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त आयोजित रक्तदान शिबीर संपन्न,शिबीराला महिलांचा उदंड प्रतिसाद 

केज/प्रतिनिधी

केज शहरातील बालाजी मंदिर येथे भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबीरामध्ये पुरुष बांधवासह महिला वर्गानी सक्रिय सहभाग घेऊन रक्तदान केले आहे. बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालय यांनी रक्त संकलन केले तसेच रक्तदात्यांना कार्ड वाटप केले.

जिल्हा रुग्णालय रक्तपेढी बीड येथील डॉ. संजना मॕडम,श्री. रामनाथ खेडकर, श्री.संतोष गायकवाड, श्री.सतीश गायकवाड यांनी रक्त संकलन करून रक्तदान करणाऱ्या सर्व बंधु भगिनी यांचे आभार व्यक्त केले.रक्तदान हे जीवनदान असुन आपल्या रक्तदानामुळे रुग्णांना जीवदान मिळु शकते.त्यामुळे रक्तदान करावे असे आवाहन चतुर्वेद प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी केले. यावेळी समाज बांधव व महिला भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आभार प्रदर्शनाने शिबीराची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!