भगवान श्री परशुराम जन्मोत्सवा निमित्त पेशवा प्रतिष्ठान अंबाजोगाई आयोजित रक्तदान शिबिरात ३२ जणांचे रक्तदान


अंबाजोगाई/प्रतिनिधी
भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त पेशवा प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या शिबिराचे उद्घाटन मकरंद सोनेसांगवीकर,डॉ. सुधीर धर्मपात्रे,ॲड. विश्वजित जोशी,विशाल जहागिरदार,संजय देशपांडे व अनिता औटी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या वेळी पेशवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी,स्वयंसेवक तसेच रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात एकूण ३२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.तसेच,या उपक्रमा दरम्यान पेशवा प्रतिष्ठान च्या १५ पदाधिकाऱ्यांनी अवयवदानाचा संकल्प करून नोंदणी केली,ही विशेष उल्लेखनीय बाब ठरली.समाजामध्ये अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी,या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कुलकर्णी यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. संकेत तोरंबेकर यांनी केले,तर आभार प्रदर्शन डॉ.महेश अकोलकर यांनी मानले.या उपक्रमा मुळे समाजात रक्तदान व अवयवदानाबाबत सकारात्मक संदेश पसरला असून नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
या रक्तदान शिबिरात डॉ. महेश अकोलकर,डॉ. संकेत तोरंबेकर,पार्थ कुलकर्णी,सचिन भातलवंडे,प्रमोद नांदगावकर, विशाल जहागिरदार,स्वप्नील कुलकर्णी,डॉ.प्रिया मुळे,स्वप्ना देशपांडे, किशोर जोशी,राहुल कुलकर्णी,सारंग हिवरेकर,राघव कुलकर्णी,कविता किरण कुलकर्णी,किरण कुलकर्णी,वल्लभ पिंगळे,वामन खोत, वामन मुळी,वेदांत जोशी, अनघा अविनाश लहुरीकर,आश्लेषा कळंबकर,पार्थ देशपांडे, डॉ मयुर सोनवळकर, शेखर देशपांडे,आनंद जोशी, संभाजी केंद्रे, पवन गिरवलकर,प्रशांत पाठक,केदार वारकरी, कल्याणी कुलकर्णी, सागर दीक्षित,डॉ. कौस्तुभ कुलकर्णी रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेक बाभुळगावकर,अक्षय देशमुख,गौरव कुलकर्णी, दीपक कुलकर्णी,सुजित दीक्षित, प्रणिता पोखरीकर,राजश्री पिंपळे,स्मिता भातलवंडे, मयुरी तोरंबेकर,रेणुका भालेराव,ऋतुजा कोंडपल्ले यांनी पुढाकार घेतला.



