सामाजिक

प्रमाणित लेखा परीक्षक सी.ए.खोडसे यांच्या कार्यालयास मा.आ. पृथ्वीराज साठे यांची सदिच्छा भेट 

केज/प्रतिनिधी

केज शहरातील सुप्रसिद्ध प्रमाणित लेखा परीक्षक तथा सहकार क्षेत्रातील प्रशिक्षक श्री.चत्रभुज खोडसे यांच्या केज येथील संपर्क कार्यालयाला माजी आमदार श्री.पृथ्वीराज साठे यांनी दि.१८ एप्रिल रोजी शनिवारी सदिच्छा भेट दिली.यावेळी माजी आमदार श्री.पृथ्वीराज साठे यांचा शाल,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी विवीध विषयावर मनमोकळी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रमाणित लेखा परीक्षक श्री.चत्रभुज खोडसे यांच्यासह अंबाजोगाई नगर पालिकेचे माजी नगरसेवक श्री.अशोक मोदी,पत्रकार चंद्रकांत पाटील,अभिषेक पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी चत्रभुज खोडसे यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!