
केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,उप मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार,केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा, खासदार बजरंग बप्पा सोनवणे,शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन (भैय्या)मुळूक,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर साहेब,शिवसेना विधान सभाप्रमुख दादासाहेब ससाणे,शिवसेना तालुका प्रमुख पृथ्वीराज पाटील, सोनीजवळा गावच्या सरपंच सौ.जान्हवीताई गोविंद ससाणे,सोनी जवळा ग्रामपंचायत चे आजी-माजी पदाधिकारी
केज तहसीलचे दिवंगत तहसीलदार राकेशजी गिड्डे साहेब,उप अभियंता सय्यद साहेब,कनिष्ठ अभियंता अंडील साहेब, मंडळाधिकारी हजारे साहेब,तलाठी वाघमारे मॅडम,कवडे मॅडम,व ग्रामसेवक श्री.राम चौरे व सर्व गावकरी यांच्या सहकार्यातून आज सोनी जवळा सबस्टेशन साठी लागणारे फायनल कागद पत्रे शासनाकडे सुपूर्द केले.लवकरच गोरगरीब शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागेल.शिवारातील शेतकऱ्यांना या सब स्टेशनचा फायदा होणार आहे या सबस्टेशनसाठी अहोरात्र सोनिजवळा ग्रामस्थांनी साथ दिली.
तसेच शासनाने सदरील सबस्टेशनला मंजुरी दिली त्याबद्दल शासनाचे गावकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्गांनी देखील या कामासाठी मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार असे शिवाजी रामदास गायकवाड युवासेना उपतालुका प्रमुख केज यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
शिवसेना विधानसभा प्रमुख दादासाहेब शंकरराव ससाणे यांनी जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक यांच्या माध्यमातून वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब व शासनाकडे व प्रशासनाकडे पाठपुरावा करून सातत्यपूर्ण प्रयत्न केला त्यामुळे सदरील सोनीजवळा येथील सब स्टेशनचे स्वप्न सत्यात उतरत आहे.



