केज शहरात बैलपोळा सण उत्साहात साजरा, डॉ.त्रिंबक चाटे यांच्या बैलपोळ्याचे केजकरांना विशेष आकर्षण

केज/प्रतिनिधी
श्रावणी अमावस्येला बैलपोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो.पशुधनाप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. वर्षभर शेतीत राबणाऱ्या पशुधना प्रती आभार व्यक्त करताना पोळ्याच्या आदल्या दिवशी हाळद आणि साजुक तुप लाऊन बैलांची मान चोळली जाते.या दिवसाला खांदे मळणी असे संबोधले जाते.
श्रावणी अमावस्येला पोळा सण साजरा केला जातो.या दिवशी सकाळी पशुधनाला गुळवणी आणि सांजा यांचा फराळ दिला जातो.त्या नंतर पशुधनाच्या शिंगांना विविध रंग लाऊन विविध आभुषण घालुन सजवीले जाते. दुपारी वाजत गाजत मिरवणूक काढली जाते .
https://youtube.com/watch?v=Xxr9OVFHqPs&feature=shared
केज शहरातील बैल पोळ्याचे आकर्षण म्हणजे भारतीय नमो संघाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा प्रतिभा नर्सिंग होम चे प्रमुख स्त्रिरोग तज्ञ डॉ.त्रिंबकराव चाटे यांचा बैलपोळा आहे. आपल्या व्यस्त कार्याला बाजुला सारुन संपुर्ण दिवस पशुधना सोबत व्यतीतकरतात. बैलाच्या मिरवणूकीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पोळा सणानिमीत्त शेता पासुन ते निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात येते.त्यानंतर बैलांचे लग्न लावुन पुरणपोळी बैलांना खाऊ घातली जाते.मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व जणांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.
आगामी काळात पशुधनाची संख्या कमी होत आहे.त्यामुळे नवीनपिढीला बैलपोळा सण का व कसा साजरा केला जातो याविषयी माहिती व्हावी हा या सण साजरा करण्या मागचा उद्देश आहे असे डॉ.त्रिंबकराव चाटे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



