केजमध्ये आज ‘बुद्ध भीम गीतांचा जल्लोष’; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आयोजन

केज/प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने केज शहरात भव्य भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार,दिनांक १७ एप्रिल २०२६रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ‘मेरा भीम जबरदस्त है’ आणि ‘भारत का संविधान है’ या प्रसिद्ध गीतांचे गायक असून,त्यांच्या सुमधुर आवाजात भीम गीतांचा हा ‘जल्लोष’ सोहळा रंगणार आहे.कुणाल प्रभाकर वराळे निर्मित ‘युगपुरुष’ या संकल्पने खाली या सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,केज.
वेळ: सायंकाळी ७:०० वाजता.
मार्गदर्शक: हारुणभाई इनामदार (जनविकास परिवर्तन आघाडी, केज).
आयोजक: सुनीलजी हिरवे (अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) या कार्यक्रमा साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सुनीलजी हिरवे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.या सांगीतिक मेजवानीमुळे केजमधील आंबेडकरवादी अनुयायांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.



