केज शहरामध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन,फुले – आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत कार्यक्रम ; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – भाई मोहन गुंड

केज/प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त केज शहरात ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ या संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.भारतीय शेतकरी कामगार पक्ष,क्रांतीसिंह नाना पाटील प्रतिष्ठान व महापुरुष जन्मोत्सव समिती,केज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे.
रविवार,दि.१९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६-३० वाजता जयभवानी चौक येथील मुक्ताई फंक्शन हॉलमध्ये कार्यक्रमास सुरुवात होणार असून महानाट्याचे सादरीकरण सायंकाळी ७-०० वाजता होईल.हैद्राबाद येथील अभ्युदय आर्ट्सअकादमी चे २२ नाट्यकलावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवास हिंदी भाषेतून प्रभावीपणे सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते रणजितसिंह पाटील तसेच माजी पंचायत समिती सभापती राजेसाहेब पापा देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रातीलमान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.या संगीत मय महानाट्यासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
केज शहरात प्रथमच अशा प्रकारचे भव्य आयोजन होत असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी महानाट्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजक शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी केले आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाई अशोक रोडे,अॕड.निखील बचुटे,रंजित घाडगे,प्रदीप गायकवाड,शेख रज्जाक, अक्षय हजारे,गुड्डू खतीब, मंगेश देशमुख,राजेभाऊ गुंड,अजिंक्य माने,नावेद मुलानी,दत्ता वाघमारे, शाम चिंचोलीकर, रामलिंग पाटील आदींनी परिश्रम घेतले आहेत.



