सामाजिक

दिंद्रुड येथील महा रक्तदान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड/प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त दिंद्रुड पोलीस ठाण्यात शुक्रवार दि.१५ आॕगष्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरास नागरिक,रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सर्व रक्तदात्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महादेव ढाकणे यांनी आभार व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अंबाजोगाईच्या अप्पर पोलीसअधीक्षक चेतना तिडके, माजलगावचे उप विभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१५ ऑगस्ट रोजी शुक्रवारी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर सदर महारक्तदान शिबीर चालु करण्यात आले, दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चालु होते.यावेळी स्वतः सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलीस उप निरीक्षक सलमान संजय शेख,पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या पोलीस कर्मचारी तसेच दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावच्या नागरिकांनी या महा रक्तदान शिबिरात सहभागी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.गरजु रूग्णांना वेळेवर रक्त मिळुन त्यांना जीवदान मिळावे.या उदात हेतुने रक्तदान शिबीर घेण्यात आले असल्याचे आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महादेव ढाकणे यांनी सांगितले . गेल्या कांही वर्षापासुन दिंद्रुड पोलीस ठाण्यात महा रक्तदान शिबिर घेण्यात येते.ती परंपरा याहीवर्षी कायम ठेवली असून या शिबिरास ठाणे हद्दीतील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ढाकणे यांनी सांगितले.

महारक्तदान शिबीरात रक्त संकलन करण्यास परळी येथील वैद्यनाथ रक्तपेढीचीटीम आली होती . सदरीलमहा रक्तदान शिचिर यशस्वी करण्यासाठी दिंदुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री.महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सलमान शेख,पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांच्यासह मार्गदर्शनाखाली दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी भारतीय नमो संघाचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब घोडके यांनी आपला सहभाग नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!