सामाजिक

केज येथे एम सी ई डी व अमृतच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गासाठी उद्योजक मेळावा संपन्न 

केज/प्रतिनिधी

केज येथे पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(एम सी ई डी )जिल्हा उद्योग केंद्र बीड महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत ) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील गरजू ना व्यावसायिक प्रशिक्षण व व्यावसायिक मार्गदर्शन साठी उद्योजक मेळावा आयोजित केला होता.

https://youtube.com/watch?v=Xxr9OVFHqPs&feature=shared

यावेळी एम सी ई डी चे जिल्हा समन्वयक श्री. दत्तात्रय क्षीरसागर, अमृत चे दिगंबर जोशी, वैद्यनाथ बँकेचेसंचालक प्रवीण देशपांडे, समस्त ब्राह्मण संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय कुलकर्णी उपस्थित होते यावेळी खुल्या वर्गातील अनेक जण उपस्थित होते.खुल्या प्रवर्गातील महाराष्ट्रात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या गरजूं ना अमृत संस्था यांच्या कडून व्याज परतावा मिळतो यासाठी आवश्यक त्या कागद पत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.

यापूर्वी खुल्या प्रवर्गासाठी शासनाकडून कसलीही मदत मिळत नव्हती परंतु अमृत ची स्थापना झाल्यामुळे ब्राह्मण, मारवाडी,कोमटी सह खुल्या प्रवर्गातील 8 लक्ष रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना या योजनेचा लाभमिळणार आहे.तसेच यासाठी लागणारे प्रशिक्षण हे महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण संस्था यांच्याकडून मोफत मिळणार आहे असेही प्रकल्प अधिकारी श्री. दत्तात्रय क्षीरसागर यांनी सांगितले तसेच वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रवीण देशपांडे यांनी बँकेचे अटीशर्थीनुसार बँकेच्या सर्व शाखा मधून कर्ज मिळेल असे सांगितले.

यावेळी अमृतचे दिगंबर जोशी,पंचायत समितीचे अधिकारी अजय ढोकर धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर, श्रीराम शेटे,श्रीधर खोत, शिवराज मुथळे,संदीप भूतडा,ऋषिकेश जोशी, गजानन औसेकर, महादेव गायकवाड, गौतम बचूटे,संतोष गालफाडे यांच्या सह लाभार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!