मंगळवार पासुन दहीफळ येथील वडमाऊली देवीच्या यात्रेचे आयोजन, भाविकांसाठी एसटी ची सोय करावी विश्वस्तांची मागणी

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे मंगळवारी याञा सुरु होत आहे.दहिफळ वडमाऊली यात्रेत येणा-या व जाणा-या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी वडमाऊली देवस्थानचे अध्यक्ष, सचिव,कोषाध्यक्ष यांनी किल्लेधारुर व बीड आगार प्रमुख यांच्याकडे लेखी पत्र देऊन त्यांना वडमाऊली देवी यात्रा स्पेशल बसेस सोडण्याची मागणी केली आहे.
दहिफळ वडमाऊली यात्रेत येणा-या व जाणा-या भाविक भक्त व महिला मोठ्या संख्येंने सहभागी होतात.
यात्रेत वादतंटा होऊ नये व यात्रा शांततेत पार पडावी म्हणून वडमाऊली देवस्थानचेअध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष यांनी केजचे पोलीस निरिक्षक स्वप्निल उनवणे यांच्याकडे एका लेखी अर्जातून वडमाऊली यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त व आर.सी.एफ.पथक देण्याची मागणी केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे ब दर्जा प्राप्त तिर्थक्षेत्र असलेल्या वडजुआई (वडमाऊली) देवीचा यात्रा महोत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मंगळवार दि.१४ एप्रिल ते १८ एप्रिल शनिवार या दरम्यान होत असलेल्या या यात्रे निमित्त ग्रामीण भागातील रसीक बांधवांच्या मनोरंजना साठी आराधी गिते व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भावीक भक्तांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती वडमाऊली देवस्थानचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे,सचिव भिकचंद ठोंबरे (सावकार), कोषाध्यक्ष हरीमास्तर ठोंबरे,सदस्य गंगाधर गदळे,बन्सी ठोंबरे रामहरी ठोंबरे व इतर सदस्यांसह गावक-यांनी केली आहे. केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे ब दर्जा असलेले तिर्थक्षेत्र वडजुआई (वडमाऊली) देवीचे मंदीर आहे.दरवर्षी चैत्र महीन्यातील अष्टमी पासुन यायात्रेला सुरुवात होतेे.दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही दि.१४ एप्रिल मंगळवारी सकाळी देवीची पालखी दहीफळ येथून बॅंड लेझीम पथक व आराधी मंडळी देवीची गाणे गाऊन पालखी महोत्सवात सहभागी होतात.
या वडजुआई (वडमाऊली) देवीला महीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवुन सुवासीनी जेवणाचा कार्यक्रम करतात. यात्रेनिमित्त दहीफळ वडमाऊली येथील माजी पंचायत समीती सदस्य दत्तात्रय (पिंटु) ठोंबरे,वडमाऊली देवस्थानचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे,सचिव भिकचंद ठोंबरे (सावकार), सदस्य हरीमास्तर ठोंबरे,सदस्य गंगाधर गदळे,बन्सी ठोंबरे,रामहारी ठोंबरे सह सर्व सदस्यांनी व गावक-यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील जनतेच्या मनोरंजना साठी १४ एप्रिल मंगळ- वारी संध्याकाळी आठ वाजता सांस्कृतीक कार्यक्रम व देवी मंदीर परिसरात आराधी गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.बुधवारी व गुरुवारी संध्याकाळी आराधीगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दि.१७ एप्रिल शुक्रवारी संध्याकाळी वडमाऊली देवी मंदीर परीसरात देवीचा (छबीना) पालखी मिरवणूक होईल.तर दि. १८ एप्रिल शनिवारी संध्याकाळी दहिफळ गावात देवीचा (छबिना) पालखी मिरवणूकीने यात्रेची सांगता होणार आहे.या आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात यात्रेकरु भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती वडमाऊली देवस्थानचे अध्यक्ष येडू (नाना) ठोंबरे,सचिव भिकचंद ठोंबरे (सावकार), कोषाध्यक्ष हरीमास्तर ठोंबरे,सदस्य गंगाधर गदळे,रामहरी ठोंबरे,बन्सी ठोंबरे सह इतर सदस्यांसह गावक-यांनी केली आहे.



