शैक्षणिकसांस्कृतीक

आज केज येथील चाईल्ड प्रायमरी स्कूलचा स्वराज्य बालमहोत्सव रंगणार,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; मान्यवरांची उपस्थिती

केज/प्रतिनिधी

केज शहरातील स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित,चाईल्ड प्रायमरी स्कूलच्या वतीने आज शनिवार, दि.१८ एप्रिल २०२६ रोजी स्वराज्य बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.धारूर चौक येथील मुक्ताई फंक्शन हॉलमध्ये सायंकाळी ५-३० वाजता हा सोहळा संपन्न होणार असून,यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

कार्यक्रमाचे स्वरूप व मान्यवर

या सोहळ्याचे उद्घाटन केजचे गट शिक्षणाधिकारी श्री. सुनीलजी केंद्रे यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केंद्र प्रमुख श्री. संजयजी चौरे हे राहणार आहेत.अंबा सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाईचे चेअरमन श्री.रमेशरावजी आडसकर साहेब हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच प्रमुख अतिथीमध्ये पशुपतीनाथ दांगट, पत्रकार विनोदजी शिंदे, भाई मोहन गुंड,डॉ. हनुमंतजी सौदागर, हनुमंतजी भोसले,डॉ. नागेशजी कराळे,ॲड. अविनाशजी धायगुडे, शिवाजी दादा ठोंबरे यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सांस्कृतिक मेजवानी

स्वराज्य बालमहोत्सव मध्ये शाळेतील चिमुकल्यांनी विविध नृत्ये,नाटक आणि गाणी बसवली असून,त्याचा सराव गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. बालकांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेचे संचालक श्री.अर्जुनजी गिराम सर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

या महोत्सवासाठी शाळेचे सर्व संचालक, पत्रकार,विविध गावांतील सरपंच,पालक,शिक्षण प्रेमी आणि कला प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चाईल्ड प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले आहे.हा स्वराज्य बालमहोत्सव २०२६ शनिवार दि.१८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५-३० वाजता मुक्ताई फंक्शन हॉल,जय भवानी चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!