बीड भाजपच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियाना ला मुंबईत उत्साहात सुरुवात


बीड/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, बीड जिल्ह्याच्या वतीने मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.या प्रशिक्षणवर्गाच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन राज्याच्या पर्यावरण,हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या प्रसंगी माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे,आमदार सौ.नमिता ताई अक्षय मुंदडा आणि भाजपचे बीडजिल्हाध्यक्ष शंकर भाऊ देशमुख यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या दिवशी उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षाच्या वरिष्ठ मार्गदर्शकांकडून विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन लाभले.यामध्ये प्रामुख्याने संघटनात्मक बांधणी यामध्ये पक्षाची पाळेमुळे तळागाळापर्यंत कशी रुजवावीत.तसेच कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे.जनसंपर्क जनतेशी थेट आणि सकारात्मक संवाद कसा साधावा.
पक्ष विचारधारा भारतीय जनता पार्टीची मूळ विचारसरणी आणि ध्येयधोरणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.या महाअभियाना मध्ये सक्षम कार्यकर्ता घडविण्याचा संकल्प करण्यात आला.या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिक सक्षम,जबाबदार आणि समर्पित कार्यकर्ता घडविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
राष्ट्रहित, समाजसेवा आणि सशक्त संघटन उभारणीसाठी हे प्रशिक्षण निश्चितच मैलाचा दगड ठरेल,असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी बीड जिल्ह्यातील भाजप चे प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले असून,कार्यकर्त्यांमध्ये या अभियानामुळे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.



