शैक्षणिकसामाजिक

श्री संस्कार इंग्लिश स्कुल मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार इंग्लिश स्कुल मध्ये थोर समाजसुधारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या विषयी सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे उच्च दर्जाचे शिक्षण देणारी श्री संस्कार इंग्लिश स्कुल मध्ये थोर समाज सुधारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सर्वप्रथम आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी अभिवादन करुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर गौरोवोद्गार काढले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या जेष्ठ शिक्षीका रेश्मा गायकवाड या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील शिक्षिका प्रियंका शिंदे,वैष्णवी काळे,सायली गायकवाड,संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे हे होते.यावेळी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!