


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात सोमवारी रात्री आठ वाजता व मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उतरेश्वर पिंप्री, कापरेवाडी,बोरगाव (बु.), नाव्होली,नांदूरघाट, राजेगाव,काळेगाव घाट परिसरात विजेचे खांब पडून व विजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. नाव्होली ते केज राज्य रस्त्यावर सात ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत.
उतरेश्वर पिंप्री येथिल तुकाराम चंदनशिव यांच्या शेतातील शेततळ्यात पाणी असतांनाही शेत तळ्यातील मेनकापड उडून गेल्यामुळे शेत तळ्यातील पाणी कमी झाले आहे.त्यांच्या डाळिंबाच्या झाडाखाली सडा पडला आहे, शेतातील जनावरांचा गोठा ही आहे.बोरगाव येथील बाबुराव वळेकर यांच्या हौदाच्या परिसरा तील व नरसूबा शेतातील एकूण दहा विजेचे खांब पडून विजेच्या तारा तुटल्या आहेत.महा वितरण कंपनीने तात्काळ दुरुस्ती करून विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.



