सामाजिक

बीड येथे लोकलढा आंदोलन मोर्चाला शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा,भाई मोहन गुंड यांची माहिती

केज/प्रतिनिधी

बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकलढा आंदोलन मोर्चाला शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना शेकापचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.या आंदोलनाच्या माध्यमा तून प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित आणि अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळेपर्यंत लढा चालूच ठेवला जाणार आहे.कोकणा तील १६८ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पा तून मराठवाड्याला मिळणार आहे.हे काम नियोजित वेळेत आणि गतीने पूर्ण करून हे पाणी जायकवाडी धरणातून थेट बीड जिल्ह्यातील शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात यावे गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प व त्याच्या उपकालव्यासाठी प्रशासनाने तातडीने सर्व्हे करावा.

कोकणातून येणाऱ्या १६८ टीएमसी पाण्यापैकी बीड जिल्ह्या तील शेतीला नेमकेकिती पाणी मिळणार आहे,हे स्पष्ट करून त्याचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तात्काळ तयार करण्यात यावा.गेवराई तालुक्यातून जाणारा उजवा कालवा आणि माजलगाव धरण यांचे जायकवाडी धरणातून मिळणारे पाणी कमी करण्यात आले आहे,ते तातडीने पूर्ववत करण्यात यावे.बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा प्रलंबित पीकविमा तात्काळ मंजूर करून त्यांच्या खात्यावर जमा करावा.तसेच, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी.

शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या मुख्य प्रश्नावर शेतकरीकामगार पक्ष पूर्ण ताकदीने आंदोलकांच्या पाठीशी उभा असून,शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र संघर्ष छेडले जाईल,असा इशारा शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!