गुन्हेगारीप्रशासकीयसामाजिक

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ४ लाखांचा गुटखा जप्त, दोघेजण ताब्यात एलसीबीची केज तालुक्यात धडक कारवाई

केज/प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केज तालुक्या तील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका कारचा ६ किलोमीटर पर्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि खटावकर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

पोलीस पथकाने माळेगाव परिसरात सापळा रचला असता, संशयित स्विफ्ट कार एमएच ०१ -बीटी २४४२ भरधाव वेगाने येताना दिसली.पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता चालकाने कार साळेगावच्या दिशेने पळवली.पोलिसांनी थरारक पाठलाग करून अखेर लोखंडे वस्ती जवळ कार पकडली. गाडीची झडती घेतली असता,त्यात राज्यात बंदी असलेला २ लाख २१ हजार रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला.

या प्रकरणी पोलीस हवालदार दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सब्दर सय्यद बुढन आणि राजू मुदसिर सय्यद दोघे रा. अजिजपुरा,केज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेंडगे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!